x
Loading...
ACE-Designs-Blog1

महत्त्व सिमेंट व लोखंडाचे:

घरबांधणीमध्ये मजबुती येण्यासाठी काँक्रिटचा वापर कसा करावयाचा ते आपण या आधीच्या लेखांमध्ये पाहिले. या काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये वापरण्यात येणार्या सिमेंट लोखंडाबाबत अधिक दक्ष असायला हवे. कारण या काँक्रिटलाही मजबूत करण्याचे काम हे दोन घटक प्रामुख्याने करीत असतात. त्यांचा वापर कसा करायचा हे देखील महत्त्वाचे असते. या दृष्टीने काँक्रिटला ताकद देणार्या या घटकांबाबत जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवे, ज्यामुळे तुमचे घर अधिक मजबूत होऊ शकेल.

घरबांधणीतील काँक्रिटीकरणाला असणारे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेतले की त्यामध्ये वापरण्यात येणारे सिमेंट लोखंड हे दोन महत्त्वाचे घटक कसे काम करतात ते कसे उपयुक्त आहेत, ते पाहाणे गरजेचे आहे. लोखंड हा घटक प्रबलीत सिमेंट काँक्रिटमधील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लोखंडी बीम काही या कामामध्ये काँक्रिटच्या आतमध्ये वापरला जात नाही. लोखंडाच्या सळ्या वा सळया या काँक्रिटीकरणाला प्रवलीत करीत असतात. एक प्रकारची मजबुती त्या काँक्रिट बीमला येत असते. त्या काँक्रिटची मजबुती ही या सळीवर अवलंबून असते. ही सळी कशा रितीने वापरली गेली आहे, त्या सळीच्या लोखंडाचा दर्जा कसा आहे, हे महत्त्वाचे आहे.त्याचप्रमाणे सळई त्या काँक्रिटमध्ये कशा रितीने बसविलेली वा स्थित आहे ती मध्यभागी असावी त्यावर सर्वबाजूने समअंतरात काँक्रिटचे आवरण (कव्हर) असावे, ते आहे का, ते पाहिले पाहिजे. काँक्रिटमध्ये ती सळी योग्यप्रकारे वाकवून (बेन्डींग) स्थित (आवश्यक त्या विशिष्ट जागी ) केली आहे का, ती नीट बांधणीमध्ये आहे की नाही या बाबीही काँक्रिट मजबूत होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या कामासाठी वापरण्यात येणारे लोखंड वा सळी घेताना बाजारात चोखंदळपणे पाहावे. ते लोखंड एम. एस. स्टील (माइल्ड स्टील)   टोर स्टील अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या बांधकामांसाठी टोर स्टील वापरले जाते

लोखंड खऱेदी करताना खालील बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे त्या लोखंडाची खरेदी करावी.

1) लोखंड वा सळ्या पुरवठादाराकडून नेहमी बिल घ्यावे. त्यावर लोखंडाचा तपशील लिहिलेला असावा. बीआयएस मानांकित स्टील घ्यावे.

2) सळईवर उत्पादनाचा मार्क असल्याची खात्री करून घ्यावी.

3) सळईच्यावर बाह्यभागात एकसारखा पीठ (ट्विस्ट) असणे आवश्यक आहे.

4) त्या लोखंडाबाबत असणारा टेस्ट रिपोर्ट घेणे.

5) स्टीलची जाडी वजन योग्य आहे ना याची खात्री करून घेणे.

6) डी2/162 या सूत्रानुसार प्रत्येक मीटर लांब सळईचे वजन काढता येते, ज्यात डी = सळईची जाडी  मिमि मध्ये येते.

सळईप्रमाणेच सिमेंट हादेखील बांधकामातील काँक्रिटमधील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बाजारामध्ये ओपीसी पीपीसी अशा दोन प्रकारात सिमेंट उपलब्ध आबे. ओपीसी अथवा ऑर्डिनरी पोर्टलॅण्ड सिमेंट अथवा ग्रेडेड सिमेंट म्हटले जाते. त्याचेही उपवर्गीकरण असते. ते 43 ग्रेड 53 ग्रेड असे मिळते. 43 ग्रेडच्या सिमेंटची ताकद 28 दिवसांनंतर 43 एन/एमएम 2 असते तर 53 ग्रेडच्या सिमेेंटची ताकद 28 दिवसांनंतर 53 एन/एमएम 2 असते.

नवीन तंत्रानुसार आता पीपीसी सिमेंट म्हणडे पोझ्झालोन (ब्लेन्डेड) सिमेंट उपलब्ध आहे. हे सिमेंट वापरताना त्यात 10 टक्के पाणी कमी वापरावे लागते. या सिमेंटच्या वापराच्यावेळी पाण्याचा तसा वापर करणे गरजेचा आहे.

सिमेंटचा रंग हा त्याच्यातील घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे पीपीसी सिमेंट हे रंगावरून चांगले की वाईट आहे, हे ठरविणे चुकीचे आहे.

पीपीसी सिमेंट वापरल्याने खालील प्रकारचे फायदे होतात

1) कमी उष्णता निर्माण होते. त्यामुळे पृष्ठभागावर भेगा कमी पडतात.

2) काँक्रिटचे मिक्सिंग सोपे बनते.

सिमेंट लोखंडाचे महत्त्व सर्वसामान्यांना समजावे यासाठी संक्षिप्तपणे ही माहिती दिली आहे. या अनुषंगाने घर बांधताना काही प्रमाणात लक्ष ठेवले गेले तरी टिकावू बांधकामाच्या वाटचालीतील बरीच पादाक्रमणा केल्यासारखे आहे, हे नक्की.

टीप प्रस्तुत लेखक हे स्ट्रक्चरल अभियंता आहेत.