काँक्रिटमध्येे लोखंडी सळयांचा वापर केला जातो. प्रबलनासाठी किंवा इंग्रजीमध्ये ज्याला रिइन्फोर्समेंंट म्हणतात, त्यासाठी या सळयांच्याभोवती काँक्रिटचे आवरण असते. या सळईला भविष्यात होणारा वातावरणाचा स्पर्श आणि त्यामुळे सळीला चढणारा गंज किंवा पाणी शिरून सळईला चढणारा गंज या सार्या प्रक्रियेला वा वातावरणातील रासायनिक पदार्थांच्या प्रवेशाला रोखण्यासाठी काँक्रिटचे आवरण महत्त्वाचे काम करीत असते. ज्यामुळे तुमचे बांधकाम हे केवळ मजबूत नाही, तर टिकावूही बनते. वास्तुरचनाकाराने सांगितलेल्या पद्धतीने काँक्रिटिकरण केले जात आहे ना, हे पाहाणे व समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे घर व त्यासाठी बांधण्यात येणारे काँक्रिटचे काम दीर्घकाळ टीकू शकेल, अन्यथा तसे न झाल्यास ते काम लवकरच खराब होऊ शकेल.

बांधकाम टिकावू करण्यासाठी सळईभोवतीचे काँक्रिटचे आवरण

इमारतीच्या बांधकामात काँक्रिट हे नित्याचेच झाले आहे. पण काँक्रिटद्वारे बांधकाम करीत असताना ते योग्य प्रकाराने, सुयोग्य पद्धतीने केले गेले तरच ते काम टिकावू व मजबूत अशा प्रकारे तयार होऊ शकते. एखादा पोल, बीम वा स्लॅब तयार करताना त्यासाठी काँक्रिटचा वापर केला जातो, तेव्हा त्यामध्ये लोखंडी सळ्यांचा वापर केला जातो. या लोखंडी सळ्या काही अशाच टाकल्या जात नाहीत, त्यांच्या वापराला, त्यांच्या तेथील अस्तित्त्वाला एक महत्त्वाचा अर्थ असतो, तो लक्षात घेणे गरजेचे आहे. कंत्राटदाराकडून वा एखाद्या त्याच्या मजुराकडून ते काम नीट होत आहे ना, त्यांना अभियंत्यांनी वा वास्तुरचनाकाराने सांगितलेल्या पद्धतीने काँक्रिटिकरण केले जात आहे ना, हे पाहाणे व समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे घर व त्यासाठी बांधण्यात येणारे काँक्रिटचे काम दीर्घकाळ टीकू शकेल, अन्यथा तसे न झाल्यास ते काम लवकरच खराब होऊ शकेल.

काँक्रिटमध्येे लोखंडी सळयांचा वापर केला जातो. प्रबलनासाठी किंवा इंग्रजीमध्ये ज्याला रिइन्फोर्समेंंट म्हणतात, त्यासाठी या सळयांच्याभोवती काँक्रिटचे आवरण असते. या सळईला भविष्यात होणारा वातावरणाचा स्पर्श आणि त्यामुळे सळीला चढणारा गंज किंवा पाणी शिरून सळईला चढणारा गंज या सार्या प्रक्रियेला वा वातावरणातील रासायनिक पदार्थांच्या प्रवेशाला रोखण्यासाठी काँक्रिटचे आवरण महत्त्वाचे काम करीत असते. ज्यामुळे तुमचे बांधकाम हे केवळ मजबूत नाही, तर टिकावूही बनते. काँक्रिटमध्ये सळी नेमकी कोणत्या स्थितीमध्ये राहावी, ते लक्षात घेऊन काम केले जाते, त्या सळीची स्थिती नीट व योग्यरितीने राहावी, म्हणून सळईच्या भोवती दिलेल्या योग्य जाडीच्या आवरणास कव्हर असे नाव आहे. काँक्रिटचे हे कव्हर सर्व बाजूंनी योग्य जाडीचे असावे तसेच ते मजबूतही असणे गरजेचे आहे. एकंदरच काँक्रिटचे हे स्वरूप लक्षात घेता काँक्रिटच्या मजबुतीमध्ये कव्हरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, ते त्या संपूर्ण बांधकामाला टिकावूपणा व कणखरपणा देणारे असते.

बांधकाम करताना ही प्रक्रिया नीटपणे होत आहे की नाही, ते पाहाणे व केवळ नुसते पाहाणे नाही तर नीटपणे दक्ष राहून त्या कामावर नियंत्रण ठेवल्यास बांधकामाला टिकावूपण लाभणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे. अयोग्य पद्धतीने केलेले काम हे संपूर्ण बांधकामाला धोकादायी ठरू शकते.. नेमके कोणते घटक या अयोग्य बांधकामामधील विशेष करून काँक्रिटिकरणाच्या कामामधील आहेत ते पाहू. म्हणजे काय करू नये ते समजून येईल.

1) सळी वा सळयांचा वापर – सळ्यांचा वापर हा काँक्रिटमधील महत्त्वाचा गाभा आहे. यासाठीच सळीची जाडी योग्य असली पाहिजेय त्या सळीच्या लोखंडाचा दर्जा चांगला असला पाहिजे. तो नसेल तर सळी खराब होण्यास वेळ लागत नाही. काँक्रिट भरताना त्यात पाण्याचे प्रमाण व काँक्रिटची ग्रेड या बाबी महत्त्वाच्या आहेत. मिश्रण कसे करत आहात, हे महत्त्वाचे असते. ते नीट झाले नाही तर मुळातच काँक्रिटिकरण कमकुवत होऊ शकते. त्यामुळे काँक्रिटची संलग्नता (कॉम्प्रिहेसिव्हनेस) कमी होतो.

2) काँक्रिटची वाहतूक – काँक्रिट हे बांधकामाच्या जागेवर तयार केले जाते असे नाही, ते काहीशा बाजूला तयार होते, तेथून ते प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी नेले जाते. ते करताना काळजी घ्यावी लागते. योग्य वेळेत ते प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी नेणे, तसेच तेथे त्याची भराई नीट करणे गरजेचे असते. अन्यथा ते सच्छद्र असते. काँक्रिटिकरण जेथे केले जात आहे, तेथे त्या ठिकाणी ते आतपर्यंत सर्व ठिकाणी नीट खाचून भरावे लागते. तसे केले नाही, तर सच्छिद्रता येते व त्यामुळे बाह्य वातावरणाचा परिणाम त्या बांधकामावर होतो.

3) आरेखन – काँक्रिटमधील प्रत्यक्ष ठिकाणी स्टील म्हणजे सळ्या त्या काँक्रिटमध्ये ज्या पद्धतीने रचल्या जातात, त्याचे आरेखन अतिशय महत्त्वाचे असते. त्या सळ्या बांधण्याची पद्धत, त्या काँक्रिटसाठी असणारे बाहेरच्या बाजूने लावलेल्या फळ्या वा प्लॅस्टिक तसेच सळ्यांभोवती असणारे हे काँक्रिट आणि त्या काँक्रिटची बाह्य बाजू यामधील अंतर हे योग्य रितीने व्यवस्थित जागा सोडून असायला हवे. त्यासाठी सळ्यांमध्ये त्या सळ्यांच्या जोडणीमध्ये कव्हर ब्लॉक वापरले जातात. हे कव्हर ब्लॉक कसे असावेत ते ही महत्त्वाचे असते.

4) कव्हर ब्लॉक – बर्याच ठिकाणी कव्हर ब्लॉकसाठी लादीचे तुकडे बसविले जातात, ज्यांची जाडी योग्य व समान नसते. किंवा काँक्रिट करताना वा ते टाकताना ते कव्हर ब्लॉक निसटून जातात व त्यामुळे सळी काँक्रिटमध्ये ज्या ठिकाणी हवी तेथे ती न राहाता हलली जाते. त्यामुळे ते लोखंड शटरिंगला म्हणजे काँक्रिटच्या बाह्यभागाला चिकटते वस्तुत: ती मध्यभागी असायला हवी, त्या सळीच्या सभोवताली असणारे काँक्रिटचे आवरण हे सर्व बाजूने समान असायला हवे.