x
Loading...
ACE Designs

काँक्रिटचे टिकावूपण:

बांधकामाच्या एकंदर पद्धतीत, रचनेत, साधनसामग्रीमध्ये पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आढळतो. देशाच्या विविध भागांमध्ये एकेकाळी त्या त्या भागांमध्ये उपलब्ध साहित्याद्वारे घरे बांधली जात होती. त्यामुळे भारतात विविध राज्यांमध्ये त्या त्या ठिकाणी एक वैविध्यता आढळून येत होती. कौलारू घरे, दगडांच्या वा मातीच्या विटांच्या भिंती, मापाच्या भिंती, चुन्याचा वापर आदी प्रकार दिसत. आता हे सारे कालबाह्य दिसू लागले आहे. सिमेंट काँक्रिटची जंगले शहरात दिसू लागली, तर त्यातही अधिक अत्याधुनिक बाबी येई लागल्या. काँक्रिट तयार करण्याच्या यंत्रामध्येही आधुनिकता आली तर त्या प्रकारच्या प्रक्रियेतही बराच फरक पडू लागला. आज काँक्रिटचा वापर सर्वाधिक होऊ लागला आहे. किंबहुना बांधकाम साहित्यामध्ये काँक्रिट हे सर्वात अधिक महत्त्वाचा मजबुती प्रदान करणारा घटक बनला आहे. या काँक्रिटचा सुयोग्यरीतीने वापर झाला, तर त्या बांधकामाला टिकावूपण मिळू शकते, तरीही तसे अनेकदा घडत नाही, असे आढळते. इमारती कोसळण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत. असे का होते, त्याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. हा शोध म्हणजे काही प्रत्येक कामामध्ये असणार्या गैरप्रकारांबाबत नाही, तर बांधकाम कशा पद्धतीने व्हायला हवे की ज्यामुळे ते काँक्रिटीकरण मजबूत होऊन इमारत वा घर टिकावू कणखर बनेल, हे पाहाणे

बांधकाम करताना चुका राहातात का, योग्य काळजी काही घेतली जात नाही का, हे देखील वेळीच पाहाणे अतिशय गरजेचे असते. जसे इमारत बांधून झाल्यानंतरही त्या इमारतीची सातत्यपूर्ण देखभाल करण्याचे लक्ष्य त्या इमारतीच्या टिकावूपणामध्ये महत्त्वाचा घटक ठरते, तसाच प्रकार बांधकाम करताना काँक्रिट तयार करताना, त्याचा वापर करताना लक्षात ठेवायला हवा. काळजीपूर्वक ते काम करायला हवे. बांधकाम करतानाच ते पद्धतशीरपणे, शास्त्रशुद्धपणे केले गेले तर इमारतीच्या दुरूस्तीव देखभालीसाठी जो प्रचंड पैसा खर्च होतो, त्यातही बचत होऊ शकेल

वातावरणातील प्रदुषणामुळे काँक्रिटमधील घटकांची जी परस्परांवर रासायनिक प्रक्रिया होत असते, त्यामुळे काँक्रिट वेलेपूर्वीच खराब होते. त्यातील लोखंडाच्या सळीला लवकर गंज पकडतो त्यामुळे काँक्रिटता भेगा पडल्याचेही दिसते. असे होता कामा नये हे म्हणणे जरी खरे असले, तरी त्यासाठी आवश्यक काळजी प्रथमपासूनच घेतली गेली तर वातावरणातील या प्रदूषणापासून बराचसा बचाव केला जाऊ शकतो, त्यामुळे काँक्रिटचे आयुष्य त्याची मजबुती वाढते. यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काँक्रिटचा दर्जा हा चांगलाच हवा. त्यासाठी तशी उपाययोजना ही सुरुवातीपासूनच हवी. काँक्रियमधील सच्छिद्रता (िेीेीळीूं) प्राधान्याने थांबवायला हवी. काँक्रिटमधील विविध घटकांचा दर्जा त्याचे प्रमाण जे आवश्यक योग्य आहे ते ठेवायलवा हवे. समतोल साधला जात आहे, की नाही ते पाहावयास हवे.

या प्रक्रियेबाबत विविध बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये 

1) बांधकामचे स्ट्रक्चरल डिझाईन ( वास्तुच्या सांगाड्याचे आरेखन)

2) तेथील वातावरणाचा योग्य अभ्यास त्या अनुषंगाने निर्णय घेणे

3) उत्तम अशा बांधकाम साहित्याचा वापर तसेच काँक्रिटची योग्य श्रेणी (ग्रेड)

4) पाण्याचे काँक्रिटमधील योग्य प्रमाण (डब्ल्यू सी रेशो), त्यात सिमेंटचे प्रमाण, काँक्रिटची ग्रेड.

5) सळईच्या सभोवताली काँक्रिटचे योग्य जाडीचे आवरण.

6) काँक्रिटची सहजता संलग्नता

टिकावू बांधकाम निर्माण करण्यासाठी वरील प्रकारे चांगल्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काँक्रिटच्या प्रत्येक प्रक्रियेतील या टप्प्यांमध्ये त्याची देखभाल त्याचा दर्जा नीट राहील यावर नियंत्रण ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी तेथे बारकाईने लक्ष ठेवणे, मजुरांनाही त्याप्रमाणे योग्य रीत्या सज्ञान करणे हे गरजेचे असते. कामावर देखरेख ठेवणार्याकडून योग्य प्रक्रियेने काम झाल्यास नक्कीच काँक्रिटची मजबुती पर्यायाने टिकावूपणा येईल.

विद्युत पुरवठ्यासाठी वायरिंग केले जाताना त्यात वापरला जाणारा पाईप पाण्यासाठी दिलेले पाईप हे जर काँक्रिट करताना असतील तर त्याबद्दलही योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

काँक्रिट खराब होऊ शकते किंवा त्याची हानी होऊ शकते ती बाब विशिष्ट टप्प्यांनुसार होते. त्यासाठी काळजी घेणे म्हणूनच सुरुवातीपासूनच लक्ष घालणे गरजेचे असते. मुळात ही हानी कशी होते त्यावर एक नजर घालू त्युळे काँक्रिटचे काम वर सांगितल्यानुसार चांगल्या रितीने होणे का गरजेचे आहे ते लक्षात येईल.

1) इमारतीला सर्वसाधारण पाणी प्रतिबंधक असे आरसीसी चे स्ट्रक्चर असते.

त्यावर वातावरणाचा, त्यावर असलेल्या विविध प्रकारच्या वजनाचा परिणाम होत असतो.

2) कालांतराने काँक्रिटच्या बाह्यांगाला अतिशय सूक्ष्म असे तडे जाण्यास सुरूवात होते. यामुळे वातावरणातील पाणी, दमटपणाने येणारे पाणी, पावसाचे पाणी त्यात जाण्यास सुरुवात होते.

3) एक प्रकारचा हा रासायनिक हल्लाच त्या काँक्रिटवर होत असतो. त्यामुळे तडे आणखी जातात, वाढतात. 2, क्लोराईड, सल्फेट यांचाही परिणाम होतो.

4) यामुळे काँक्रिट खराब होण्यास वा त्याची हानी होण्यास सुरुवात होते. त्याचा परिणाम त्या काँक्रिटची ताकद वा मजबुती कमी होण्यास सुरुवात होते. कालांतराने ते कोसळते.

अशी ही काँक्रिट खराब होण्याची प्रक्रिया लक्षात घेतली तर ते चांगले बांधले गेलेले काम असले तरी त्याची देखभालही नीट केली गेली पाहिजे, हे ही तितकेच महत्त्वाचे.